बीड

विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

दि.3 जुलै :- महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे आ. राहुल नार्वेकर यांची निवड झाली. महाविकास आघाडीचे राजन साळवी यांचा नार्वेकर यांनी पराभव केला. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना भाजपचा हा पहिला मोठा विजय मानला जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर शिवसेना भाजपच्या या नव्या सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी आणि अध्यक्षांची निवड करण्यासाठी रविवार सोमवारी दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानुसार रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या सर्व आमदारासोबत फेटे बांधून विधीमंडळात दाखल झाले. त्यानंतर विद्यमान उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अध्यक्ष पदाच्या निवडीचा प्रस्ताव सभागृहात मांडला.

राहुल नार्वेकर यांची 164 मतांनी निवड झाली, त्यामुळे राजन साळवी यांना 107 मते पडली.एमआयएम,समाजवादी पक्ष आणि काही अपक्ष हे तटस्थ राहिले.