बीड

फडणवीसांच्या नावापुढे ‘उप’ शब्द लावायला जड जातंय; राऊतांचा टोला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 July :- देवेंद्र फडणवीस यांना एकतर माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री आपण बोलत राहिलो. मला त्यांच्या नावपुढे उप असे लावताना मला जड जात आहे. त्यांना उपमुख्यमंत्री म्हणणे जीवावर येत आहे. त्यांनी पक्षादेश स्वीकारला. त्यामुळे त्यांचे कौतुक केले पाहिजे, असे म्हणत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना डिवचले. मुख्यमंत्रिपदाच्या तयारीत बसलेल्या माणसाला उपमुख्यमंत्री व्हा, असा आदेश दिला जातो आणि ज्युनिअर मंत्री असलेल्या दुसऱ्या नेत्याला मुख्यमंत्री केल्यास कोणाला आनंद होईल? असा सवालही त्यांनी केला.

ईडी चौकशीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, मी चौकश्यांच्या बाबतीत निडर आहे. आणि मित्रांनाही सांगत असतो की, सत्य तुमच्या बाजूने असेल तर, घाबरायचे कारण नाही. मी ईडी कार्यालयात गेल्यावर अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य केले. मी बॅग भरून आलो आहे, असे अधिकाऱ्यांना काल सांगितले. तुम्ही तुमचं काम करा आणि मी माझं कर्तव्य पार पाडतो. शुक्रवारी संजय राऊत यांची अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी 10 तासांहून जास्त काळ चौकशी केली.

पुढे ते म्हणाले की, आपल्याला जाणूनबुजून अडकवले जातेय. त्यावेळी आपला अंतरात्मा आपल्याला सांगत असतो की, आपण काही केलेले नाही त्यामुळे कुठलीही चौकशी असो, त्याला सामोरे गेले पाहिजे. त्याच आत्मविश्वासाने मी चौकशीला गेलो आणि 10 तासांनी बाहेर आलो. गुवाहटीला जाण्याचा मलाही मार्ग होता. पण मी नाही गेलो. आमची शिवसेना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिलो.