महाराष्ट्र

अमृता फडणवीसांचा लंडनमध्ये गौरव

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 July :- महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचा ब्रिटन संसदेत ‘इंडियन ऑफ द वर्ल्ड’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. याची माहिती अमृता फडणवीस यांनी ट्विवट करून दिली आहे. अमृता फडणवीस या लंडन दौऱ्यावर आहेत. तेथील काही फोटो त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.

अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ब्रिटनच्या संसदेत ‘इंडो-यूके संबंध’या विषयावर बोलणे आणि ब्रिटनच्या संसदेत ‘इंडियन ऑफ द वर्ल्ड’ पुरस्कार प्राप्त करणे, हा सन्मान होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नाने भारत-यूके संबंध मजबूत झाले आहेत. तसेच, हेच संबंध विविध राज्य आणि स्थानिक पातळीवरही विस्तारत आहेत.

याशिवाय काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी लंडनच्या मंदिरातील फोटो पोस्ट केले होते. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की, महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली तसेच, स्वामीनारायण हिंदू मंदिरामध्ये विशेष पुजा केली. यासोबतच महाराष्ट्र राज्यातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमिवर ‘लोकशाहीचा मंत्र आपण कधीही विसरू नये; लोक आधी, पार्टी पुढे, स्वत: लास्ट ” असा सल्लाही त्यांनी कॅप्शनमध्ये दिला.

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमृता यांनी आपल्या ट्विट मधून महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट मध्ये अमृता फडणीस यांनी लिहिलं आहे, की ”महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस यांना मनःपूर्वक शुभेच्छा!”

अमृता फडणवीस या सोशल मीडियावर सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या राजकीय, सामाजिक अश्या अनेक विषयांवर अमृता फडणवीस स्वतःचं मत व्यक्त करत असतात. 2005 मध्ये अमृता आणि फडणवीस यांचा विवाह झाला होता. त्यावेळी त्या अ‍ॅक्सिस बँकेत काम करत होत्या आणि देवेंद्र आमदार होते. 31 ऑक्टोबर 2014 रोजी, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि अमृता सीएम हाऊसमध्ये जाणाऱ्या सर्वात तरुण पहिल्या महिला बनल्या. त्यांना दिविजा फडणवीस ही मुलगी आहे.