सावधान! आणखी एका चक्रीवादळाचा धोका
हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या आठवड्यात हे कमी दाबाचं क्षेत्र ओडिशाच्या दिशेनं जाऊ शकतं. कमी दाबाचा पट्टा तयार होणं हा चक्रीवादळाचा एक प्रकार असून तो पहिला टप्पा आहे. त्यामुळे त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत अशी माहिती त्यांनी वृत्तसंस्था पीटीआयला दिली.
एका महिन्यात 2 चक्रीवादळं
मागच्या एका महिन्यातच देशात दोन चक्रीवादं आली. गेल्या महिन्यात बंगाल आणि ओडिशामध्ये पहिलं वादळ आलं.भारताच्या या शतकाचं हे पहिलं सुपर चक्रीवादळ होतं. त्यानंतर वाऱ्याचा वेग कमी झालेला पहायला मिळाला. पण या वादळामुळे बंगाल आणि ओडिशाचं मोठं नुकसान झालं. बंगालमध्ये किमान 80 लोकांचा मृत्यू झाला. या वादळाच्या धक्क्यातून लोक कुठे सावरतात तोच अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आणि निसर्ग चक्रीवादळाने कहर केला. या चक्रीवादळा वेळी वाऱ्याचा वेग 120-130 किमी / तास होता. यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.