घशात घास अडकून 2 वर्षीय मुलाचा मृत्यू
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
1 July :- घशात घास अडकल्यानंतर काळजाच्या तुकडा तडफडून डोळ्यादेखत गेला. पोटच्या गोळ्याचा तडफडून झालेला मृत्यू सहन न झाल्याने आई-वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना सांगली येथील आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथे घडली. दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या दोन वर्षीय मुलीचा खाऊचा घास घशात अडकून मृत्यू झाला होता, तिच्या वियोगाने आई-वडिलांनी हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.
करण हेगडे (28) आणि शीतल हेगडे (22) असे या आई वडिलांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आटपाडी तालुक्यातल्या राजेवाडी या ठिकाणी एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली. दोन दिवसांपूर्वी हेगडे दांम्पत्याची दोन वर्षांच्या मुलीच्या घशात खाऊचा पदार्थ अडकला होता. यानंतर मुलीचा मृत्यू झाला. या दरम्यान मुलीची झालेली तडफड पाहून हेगडे दाम्पत्य हे व्यथीत झाले होते. मुलीची तडफड, त्यानंतर मृत्यू आणि विरह सहन न झाल्याने माता-पित्यानेही आयुष्य संपवले. राजेवाडी येथील काणबुनाथ मंदिरासमोर असणाऱ्या एका झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन हेगडे दांपत्याने आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आटपाडी पोलिसांनी धाव घेतली. झाडाला लटकलेल्या दाम्पत्याजवळ एक चिठ्ठीही पोलिसांना आढळून आली. यात मुलीचा झालेला मृत्यू हा सहन झाला नाही, यातूनच आम्हीही आत्महत्या करत असून याला कोणीही जबाबदार नाही, असा मजकूर या चिठ्ठीमध्ये होता असे आटपाडी पोलिसांच्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र मुलीच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी केलेल्या आत्महत्येच्या घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.