महाराष्ट्र

फडणवीसांच्या जखमेवर मीठ; पृथ्वीराज चव्हाणांचे उपरोधिक ट्विट

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 July :- माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे एक ट्विट मोठे चर्चेत आले आwहे. या ट्विटद्वारे त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जखमांवर मीठ चोळले आहे. मुंबईच्या भाजप कार्यालयात लग्न सोहळा असताना नवरदेव (देवेंद्र फडणवीस) गायब आहे. अशी खिल्ली उडवत टीका केली. या टीकेची सर्वत्र चर्चा आहे.

एकनाथ शिंदे गटाच्या सहकार्याने राज्यात भाजपची सत्ता आली आहे. यानिमित्त आज मुंबईतील भाजपच्या कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा हे करीत आहेत. ते त्यांचे पक्षातील विरोधक मानले जातात त्यामुळेच फडणवीस तेथे जाणार नाही अशी चर्चा आहे.

सांगण्यात येते की, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष पदावरुन लोढा यांना हटवून आपले निकटवर्तीय खासदार मनोज कोटक यांना अध्यक्ष बनवणार आहे. त्यामुळे लोढा आणि फडणवीस यांच्यात बेबनाव असल्याची अंतर्गत खदखद समोर आली आहे.

एरव्ही फारसे माध्यमासमोर न दिसणारे आणि आपल्या शांत, संयमी स्वभावाशी सुपरिचित असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खरमरीत ट्विट केले आहे. राज्यात सत्तांतर घडले असून महाविकास आघाडीची सत्ता एकनाथ शिंदे यांच्याद्वारे भाजपने हिरावून घेतली. ही सलही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आहे त्यामुळे ते भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही.

दिल्लीच्या भाजप नेत्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेला संपविण्यायाठी म्हणावे की, ठाकरे घराण्याचे असलेले शिवसेनेतील अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे. जातीय समीकरणामुळे देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदेंना भेटले आहे. मात्र हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपमान आहे, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्याग केला नाही, त्यांना आदेश पाळावा लागला. राष्ट्रीय स्वयसेवक संघाने दबाव आणून फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद सोपवण्यात आले.