बीड

शिंदे सरकारचा नवा धक्का

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 July :- एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यांनी शुक्रवारी राज्यपालांकडून विधान परिषदेवर नियुक्त करण्यात येणाऱ्या 12 सदस्यांची नवी यादी पाठवण्याचे संकेत दिल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने दीड वर्षांपूर्वीच या जागांसाठी आपल्या 12 सदस्यांची नावे पाठवली होती. त्यानंतर त्यांनी अनेकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे ही नावे हातावेगळी करण्याची विनंती केली. पण, राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. आता नव्या सरकारच्या नव्या यादीवर ते कोणता निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.