फडणवीसांना अपमानित करण्यासाठी दिले उपमुख्यमंत्री पद- आंबेडकर
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
1 July :- केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीसांना अपमानित करण्यासाठीच उपमुख्यमंत्री पद दिले, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते पुण्यात बोलत होते. आंबेडकर म्हणाले की, राज्यातील राजकारणात वेगवेगळया प्रकारच्या अभूतपूर्व घडामाेडी घडताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार काेसळले.
नवीन सरकार मध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री हाेतील, असे अपेक्षित हाेते. मात्र, आश्चर्यकारकरित्या एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आले आणि फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांना अपमानित करण्यासाठीच उपमुख्यमंत्री पद दिले, असे.
आंबेडकर म्हणाले, नवीन सरकारचा शपथविधी हा कायदेशीर असून उध्दव ठाकरे यांनी बहुमत न दाखवताच राजीनामा दिला आहे. राज्यपाल यांनी नवीन सरकारला बहुमत सिध्द करा असे सांगितले आहे. त्यापूर्वीच विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येते याबाबत राज्यपाल यांनी हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.
विधिमंडळाचे कामकाज करण्याची अद्याप त्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, राज्यपाल हे नवीन सरकारबाबत सकारात्मक आहे. राज्यपाल पद स्वयात्त असून त्यांना अधिकार आहे मात्र त्याचा वापर याेग्यप्रकारे झाला पाहिजे. शिवसेनेने सर्वाच्च न्यायालयात 16 आमदारांचे अपात्रेबाबत याचिका दाखल केली आहे. त्याबाबत 11 जुलै राेजीच निर्णय हाेणार. मात्र, शिवसेनेने त्यापूर्वी राज्यपाल, राष्ट्रपतींकडे जाऊन सांगितले पाहिजे की, बहुमत सिध्द झाल्यावरच इतर विधिमंडळाचे अधिकार मिळतील. बिचारे फडणवीस यांचा केंद्रीय नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला आहे.
फडणवीस जाहीरपणे सांगत हाेते की, मी काेणतेही पद स्विकारणार नाही. मात्र, काही वेळातच त्यांना वरिष्ठांकडून निराेप आल्यानंतर पद स्विकारावे लागले. यावरुन इतके दिवस सुरु असलेली त्यांची तानेशाही संपुष्टात येऊ लागल्याचे दिसून येते. त्यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज आहेत.