महाराष्ट्र

उद्या ईडीच्या चौकशीला हजर राहू शकणार नाही- राऊत

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 Jun :- एकीकडे सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे गटाच्या याचिकांवर सुनावणी सुरू असताना दुसरीकडे संजय राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काही वेळापूर्वीच ईडीने संजय राऊत यांनी समन्स बजावलं आहे. ईडीने त्यांना उद्या म्हणजेच मंगळवारी चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश दिले आहे. मात्र, आपल्याला उद्या चौकशीसाठी हजर राहाता येणार नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

उद्या माझी अलिबागला सभा आहे आणि इतरही अनेक ठिकाणी सभांचं आयोजन केलं आहे. त्यामुळे मंगळवारी मी त्या सभेला जाणार आहे आणि ईडीकडे वेळ मागणार आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. उद्या ईडीच्या कार्यालयात गेलो नाही, तर चौकशीसाठी नक्की हजर राहील. कारण मी पळ काढणारा नाही. कायदेशीर प्रक्रियाला सामोरं जाईल, असंही राऊत म्हणाले.पुढे संजय राऊत यांनी हा सगळा डाव असल्याचं अप्रत्यक्षपणे बोलत म्हटलं की तुम्ही मला कितीही त्रास दिला तरी मी घाबरणार नाही.

गुवाहाटीमध्ये जाण्यापेक्षा खोट्या आरोपात तुरुंगात गेलो तरी चालेल. तुम्ही माझा गळाही कापला तरी मी गुवाहाटीला जाणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत राहणार आणि ती वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार, असंही राऊत म्हणाले संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे.

28 जूनला चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. प्रवीण राऊत आणि पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. यापूर्वी ईडीने त्यांच्या काही मालमत्ता जप्त केल्या होत्या. संजय राऊत यांना उद्या म्हणजेच मंगळवारी सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.