युवराजांनी धमक्या देणं बंद करावं; राणेंचा हल्लाबोल
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
27 Jun :- महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते, मंत्री एकनाथ शिंदे व नाराज आमदारांसह आसामच्या गुवाहाटीत मुक्कामी आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. आमदारांनी बंडखोरी केल्याने मविआ सरकार धोक्यात आले आहे. यातच भाजप नेते नारायण राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
नारायण राणे यांनी ट्विट करून म्हटले की, शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा. युवराजांनी धमक्या देणं बंद करावं. अंगावरचे मच्छर मारता येत नाहीत अशांच्या, ‘गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेतं बाहेर पडतील’, अशा वल्गनांवर कोण विश्वास ठेवेल? अशा धमक्या देणं हा गुन्हा होत नाही का? असा सवाल त्यांनी केला.
एअरपोर्टवरून उतरले की विधानभवनात जाणारा रस्ता वरळीतून जातो. या सर्व बंडखोरांना विधानभवनाची पायरी चढू देणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यावर नारायण राणे यांनी शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा. युवराजांनी धमक्या देणे बंद करावे. अंगावरचे मच्छर मारता येत नाहीत अशांच्या, असे म्हणत प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना गुवाहाटीहून 40 आमदारांचे मृतदेह मुंबईत येतील व त्यांचे शवविच्छेदन होईल, असे विधान केले होते. त्यावर ‘गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेत बाहेर पडतील’, अशा वल्गनांवर कोण विश्वास ठेवेल?, असे म्हणत बोचरी टीका केली. याशिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल नारायण राणेंवर अटकेची कारवाई झाली होती. त्याचा संदर्भ देत अशा धमक्या देणं हा गुन्हा होत नाही का? असा सवाल नारायण राणे यांनी केला.