बीड

कोरोनाबाधित महिला 42 लोकांच्या संपर्कात

परळी/बीड- कोरोना विषाणूच्या संक्रमांपासून वाचण्याकरीता जनसंपर्क टाळा अशा सूचना प्रशासनाकडून वारंवार दिल्या जातात पण भरपूर नागरिक या सूचनेचे पालन न करता अनेक ठिकाणी फिरताना दिसतात आणि कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात येतात.परळी शहरातील जगतकर कॉलनी, भीमनगर येथील कोरोना बाधित महिला जवळपास 42 लोकांच्या संपर्कात आली असल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
कोरोनाबाधित महिलेस अगोदर पासून किडनीचा आजार असल्यामुळे तिला उपचाराकरिता औरंगाबाद येथे नेण्यात आले होते.कोरोनाची लक्षणे दिसल्या कारणाने या महिलेची तपासणी करण्यात आली आणि नंतर तिला कोरोनाची बाधा असल्याचा रिपोर्ट आला. विचारपूस केल्यावर निष्पन्न झाले हि महिला 42 व्यक्तीच्या संपर्कात आली आहे.जवळीक 19 नातेवाईकांचे स्वॅब तपासणीकरिता उद्या दि.7 रोजी घेणार असल्याची माहिती आहे.ता आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे यांनी दिली.
स्वस्थ राहा…गर्दी टाळा…काळजी घ्या…!संपर्क