महाराष्ट्र

शिंदे गटाकडून कोणताही प्रस्ताव नाही; मुनगंटीवारांची माहिती

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 Jun :- शिवसेनेच्या बंडखोर गटामुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिर परिस्थितीवर भाजपचे लक्ष आहे; आमच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सत्ता स्थापनेबद्दल चर्चा झाली नाही. जसे जसे गटांकडून प्रस्ताव येतील त्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ. तूर्त भाजप वेट अँड वाॅचच्या भूमिकेत आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज सायंकाळी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज झाली. या बैठकीला भाजपचे राज्यातील वरिष्ठ नेते उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी वार्तालाप केला.

सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, आम्हाला एकनाथ शिंदें व गटाकडून कोणता प्रस्ताव आला नाही, ते बंडखोर आमदार आहेत असे आम्ही म्हणणार नाही. संजय राऊत यांच्या भाषेत आम्हाला बोलायचे नाही. मुनगंटीवार म्हणाले की, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदेंकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याने आजही आम्ही वेट अँन्ड वॉचच्याच भूमिकेत आहोत. बंडखोर कोण हे येणाऱ्या काळात कळेलच असेही ते म्हणाले.

मुनगंटीवार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज झाली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर तसेच आगामी काळात जनता पक्षाने काय भूमिका घ्यायची यावर आम्ही चर्चा केली.

आगामी काळात अशी परिस्थिती निर्माण होणार असल्याने भाजप कोअर कमिटीची टीम पुन्हा बसून जनहिताचा निर्णय घेणार आहे. भारतीय जनता पक्षाने आज बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे आम्ही आगामी दिवसांवर चर्चा केली आहे. आगामी काळातील रणनीतीबाबतही चर्चा झाली असे मुनगंटीवार म्हणाले.