सोनिया गांधी यांच्या स्वीय सहाय्यकांवर बलात्काराचा गुन्हा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
27 Jun :- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या स्वीय सहाय्यकांवर बलात्काराचा आरोप झाला आहे. या प्रकरणी एका दलित महिलेने केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याविरोधात रविवारी दिल्लीच्या उत्तम नगर पोलिस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला आहे. त्यात सोनियांचे खासगी सचिव पी. पी. माधवन यांनी आपल्यावर लग्न व नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा दावा करण्यात आला आहे.
महिलेच्या तक्रारीनुसार, तिचा पती काँग्रेस कार्यालयात होर्डिंग लावण्याचे काम करत होता. 2 वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यानंतर तिने नोकरीसाठी माधवन यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात आले. हिलेने माधवन यांच्यावर लग्न व नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पण माधवन यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
मी महिलेला ओळखतो. पण तिने केलेले आरोप धादांत खोटे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 21 जानेवारी 2022 रोजी माधवन पहिल्यांदा महिलेला आपल्या घरी बोलावले. त्यावेळी त्यांनी तिला आपण घटस्फोटीत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांची अनेकदा भेट झाली. त्यात माधवन यांनी महिलेवर अनेकदा जबदरस्ती केली, असे या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.