बीड

बंसल क्लासेस करणार १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा नागरी सत्कार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 Jun :- विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरीत करणे आणि त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित करून देणे, हा दृष्टिकोन व उद्देश ठेवून राजस्थान कोटा येथील बंसल क्लासेस बीडच्या वतीने सौ. के एस के महाविद्यालय सभागृह येथे दि २९ जुन २०२२ संध्या. 5.30 वाजता. यंदा दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा या कार्यक्रमामध्ये भव्य दिव्य नागरी सत्कार व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

बीड शहरातील पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या अभूतपूर्व कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन बंसल क्लासेस बीडचे अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर आणि सचिव डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आपल्या अभिनव शैक्षणिक तेजस्फूर्ती उपक्रमांनी अत्यल्पवधीत बीडवासीयांचा विश्वास प्राप्त करण्यात यशस्वी झालेल्या राजस्थान कोटा येथील बंसल क्लासेसने बीड शहरात दर्जेदार शैक्षणिक वातावरण निर्माण केले आहे. याबरोबरच बीड शहरातील अनेक विद्यार्थी, पालकांनी बंसल क्लासेसच्या अभ्यासक्रम नियोजन पद्धत, शैक्षणिक धोरण, विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेला गृहीत धरून केलेले अभ्यास मार्गदर्शन, उत्कृष्ट पाठयपुस्तके आणि शंका निरसन करून देण्याची पद्धत समजून घेत मोठ्या संख्यने प्रवेश देखील घेतली आहेत.

बंसल क्लासेस बीडच्या वतीने सौ. के एस के महाविद्यालय सभागृह येथे दि २९ जुन २०२२ संध्या. 5.30 वाजता. यंदा दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा या कार्यक्रमामध्ये भव्य दिव्य नागरी सत्कार व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता 10 वी 2022 मध्ये 90% पेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेची प्रत 9011776480 या मोबाईल क्रमांकावर दिनांक 28 जुन पर्यंत पाठवावी असे आवाहन बंसल क्लासेसच्या वतीने करण्यात आले आहे.

विद्यार्थी, पालकानीं मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

यंदा पार पडलेल्या इयत्ता दहावी परीक्षेत बीड शहरातील विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत समाधानकारक यश संपादन केले. या सर्व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा या हेतूने बंसल क्लासेस बीडच्या वतीने कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये यंदा दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भव्य दिव्य नागरी सत्कार व मार्गदर्शन शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. बीड शहरातील पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन बंसल क्लासेस बीडचे अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर आणि सचिव डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या वतीने करण्यात आले आहे.