महाराष्ट्र

दगाबाजांनो डोळ्यात डोळे घाला; बंडखोरांना आदित्य ठाकरेंचे आव्हान

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 Jun :- शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना आव्हान दिले आहे. ”मुंबईत यावे आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगावे की आमचे काय चुकले. दगेबाजी करणारे, पळून जाणारे जिंकत नसतात.” अशी खोचक टीकाही त्यांनी केली. मुंबईत विकास विषयक कामांच्या शुभारंभावेळी माध्यमांनी त्यांना गाठत सद्यस्थितीवर प्रश्न विचारले त्यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर शरसंधान साधले.

आदित्य ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदे गटाच्या सुनावणीनंतर निकालाबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी निर्णय महत्वाचा आहे, पण हा निर्णय वाचायचा आहे त्यामुळे मला निर्णय बघुद्या त्यानंतर भाष्य करेल असे त्यांनी स्पष्ट केले. आदित्य म्हणाले, शिवसेनेशी गद्दारी करणारे जिंकत नाहीत. जे पळून जातात ते जिंकत नसतात. फ्लोअर टेस्टसाठी आम्ही तयार आहोत, पण ते तयार आहेत का, असे आव्हानच त्यांनी शिंदे गटाला दिले.

आदित्य म्हणाले, जे पळून गेलेले आहेत, त्यात आमचेही लोक आहेत त्यांना पळवून नेले. आमची सुटका करा म्हणून त्यांचे आम्हाला फोन येत आहेत. त्यांना फसवले गेले असून ते आमच्या संपर्कात आहेत. दगाफटका करणाऱ्यांनी डोळ्यात डोळे घाला मग बोलावे. निकटवर्तीय उदय सामंत एकनाथ शिंदे गटात गेले तर त्यांनी मी सांगतो की, त्यांनी डोळ्यात डोळे घालायला हवे. जे बंडखोर आहेत त्यांनीही डोळ्यात डोळे घालून आम्हाला सांगावे की आमचे काय चुकले, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. यावर आदित्य यांनी टीका केली की, राजकारण सर्कस बनले आहे त्यावर काय बोलणार? माझी सर्वात मोठी फ्लोअर टेस्ट हीच की जे पळाले त्यांनी हिमतीने येथेच राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीत उभे ठाकायला हवे होते पळून जायला नको होते.