महाराष्ट्र

राज्यपाल कोश्यारी कोरोनामुक्त; सत्तास्थापनेच्या हालचालींना मिळणार गती

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

26 Jun :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर ते राजभवनात दाखल झाले आहेत. कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना गिरगावच्या रिलायंस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारींना कोरोनाची लागण झाल्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर गोव्याच्या राज्यपालांकडे तात्पुरती महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली होती.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडानंतर राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गदारोळात राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आज शिंदे गट दुपारी बैठक घेणार असून, राज्यपाल देखील कोरोनामुक्त झाल्याने एकनाथ शिंदेंचा बंडखोर गट लवकरच राज्यपालाची भेट घेण्याची शक्यता आहे. एका बाजुला एकनाथ शिंदे हे सोबतच्या आमदारांसोबत गट स्थापन करण्याची तयारी करत आहेत. ते राज्यपालांकडे याबाबत दावा करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.