बीड

ग्रामपंचायत सदस्यास मारहाण

परळी – नागदरा येथील होलेर समाजाचे ग्रामपंचायत सदस्य माणिक वैजनाथ बरिंगणे हे गावातील गांधीनगर जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आलेले लाईटचे पोल बघण्यासाठी भाऊ पिराजी सोबत गेले. यावेळी गोविंद रामराव केंद्रे याने जातीवाचक शिवीगाळ करून लय माजलास असे म्हणत मारहाण केली. यानंतर ते घरी गेल्यावर तिथे जाऊन घराच्या बाहेर काढून त्यास दगड, काठ्या, लाथा बुकयानी मारहाण करण्यात आली. कंबरेत व हातावर दगड घालून त्याना जखमी करण्यात आले.
गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिस टाळाटाळ करत होते.ही माहिती जेष्ठ नेते सुभाष वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संजय गवळी, गौतम साळवे, सामाजिक कार्यकर्ते विकास रोडे, पत्रकार विकास वाघमारे यांनी समजली. त्यांनी परळी ग्रामीण पोलिसांची भेट घेत प्रकरणाची माहिती दिली, त्यानंतर गुन्हा दाखल केला. माणिक बरिंगणे याच्या फिर्यादी वरून गोविंद रामराव केंद्रे, जनार्दन दत्ता केंद्रे, सूर्यकांत प्रसाद,जनार्दन दत्ता केंद्रे, सूर्यकांत प्रसाद नागरगोजे, सुधाकर माणिक नागरगोजे, राहुल सुधाकर नागरगोजे, कैलास दत्ता केंद्रे, भारतात रामराव केंद्रे, सुवर्णा गोविंद केंद्रे (सर्व रा.नागदरा) यांच्या विरुद्ध कलम 324, 452, 143, 147, 149, 323, 504, 506, अ.जा.जमाती प्रतिबंधक ॲकट 3 (1) 3 (1), 3 (2) 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राहुल धस हे करीत आहेत.