महाराष्ट्र

“मी सुशिक्षित गुंड आहे, जर बाहेर पडलो तर…”

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 Jun :- एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात उलथापालथ होऊ लागलेली असताना दुसरीकडे शिवसेनेत आत्तापर्यंत दबून राहिलेले अंतर्गत मतभेद देखील समोर येऊ लागले आहेत. या निमित्ताने हे गट देखील एकमेकांसमोर उभे राहिल्याचं चित्र निर्माण झालं आहे. याचीच परिणती कोल्हापुरात दिसत असून इथे बंडखोर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर आणि शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रवीकिरण इंगवले यांच्यातील वाद उफाळून आला आहे.

इंगवले यांनी कोल्हापुरात काढलेल्या मोर्चादरम्यान राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर फाडल्यानंतर क्षीरसागर यांनी इंगवलेंना उघड धमकी दिली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात सध्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. ठिकठिकाणी या आमदारांचा निषेध करण्यासाठी मोर्चे काढले जात आहेत.

पुण्यात तानाजी सावंत यांचं कार्यालय काही शिवसेना कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर कोल्हापुरात बंडखोर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर शिवसेना कार्यकर्त्यांनी काढलेल्या मोर्चादरम्यान फाडण्यात आले. यावरून आता क्षीरसागर आणि इंगवले यांच्यात जुंपली आहे.