आमच्यात भांडणे लावून राष्ट्रवादी मजा पाहतेय- आ शिरसाट
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
25 Jun :- शिवसेनेत अंतर्गत भांडण लावून राष्ट्रवादी मजा पाहत आहे. शिवसैनिकांनी भांडू नये आपल्याच लोकांची डोकी फोडू नये. अशाप्रकारे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. तसेच राष्ट्रवादीचा उद्देश आम्हाला कायद्याच्या कचाट्यात अडकवणे हा आहे, मात्र आम्ही पण याला उत्तर द्यायला तयार आहोत. असे म्हणत शिरसाट यांनी राष्ट्रवादीला खुले आव्हान दिले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी हे आरोप केले आहेत.
यावेळी ते म्हणाले, हे सर्व राष्ट्रवादी करत आहे. बंडखोरांना कायद्याच्या कचाट्यात अडकवून कशाप्रकारे ही प्रक्रिया लांबवता येइल हे ते पाहत आहेत. माझ्या मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यातून मिळालेल्या निधीतून कामे झाली आहेत. ज्या मतादारांनी आम्हाला निवडून दिले, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला ठोस निधी मिळाला नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
आम्ही शिवसेनेतच आहोत. कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही. आमचा गट ठाम आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. ते जे बोलले, त्यावर कमेंट करण्याइतका मी मोठा नाही. त्यांनी आम्हाला साथ मागितली तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ, पण ते आमच्यावरच कारवाई करत आहेत. ते आमचे ऐकत नाही हेच तर आमचे दुखणे आहे. असेही यावेळी त्यांनी बोलून दाखवले.