महाराष्ट्र

शिवसैनिक आक्रमक, राज्यात अलर्ट?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 Jun :- एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी शुक्रवारी मुंबई व अहमदनगर येथील बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर हल्ला केला. यामुळे येथे कायदा सुव्यवस्थेचा बाका प्रसंग उद्भवला. या घटनाक्रमामुळे गृह विभागाने राज्यात अतिदक्षतेचा इशारा जारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि ते शिंदे गटाच्या गटात सामील झाले. यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी कुडाळकर यांच्या विरोधात मोर्चा उघडला. आज मुंबईतील त्यांच्या कार्यालयावर चाल करून त्यांनी कार्यालयाच्या दर्शनी भागाची तोडफोड केली. तर नगरमध्ये बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासले. यावेळी शिवसैनिक संतप्त झाले होते त्यांनी घोषणाबाजीही केली.

शिवसेनेचे बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांचे कुर्ल्यातील कार्यालय फोडले. तसेच नगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासल्यानंतर गृहविभाग दक्ष झाला असून राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

संतप्त शिवसैनिकांनी कुडाळकर यांच्या कार्यालायावर चाल केल्यानंतर कार्यालयाच्या दर्शनी भागावर नामफलक आणि कुडाळकर यांचा फोटो होता त्यावर लोखंडी काठीने घाव घालत त्यांचा फोटो फोडला त्यानंतर नावाचीही तोडफोड केली. अहमदनगरमध्ये आज शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसले त्यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे शहरात असलेल्या एका पोस्टरवर काळे फासले. त्यानंतर त्यांनी शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शिवसेनेचे (ShivSena) निष्ठावंत समजले जाणारे आमदार मंगेश कुडाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर ते गुवाहाटीला गेले. मंगेश कुडाळकर हे मुंबईतल्या कुर्ला नेहरुनगरचे शिवसेना आमदार आहेत.