महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत राऊतांचे स्पष्टीकरण

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 Jun :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह भाषणात सरकारी वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेतला; त्यानुसार ते आता थोड्याच वेळात वर्षा बंगल्याहून प्रयाण करणार आहेत. तत्पुर्वी गुवाहटी येथे शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह ्अन्य तीन आमदार गुवाहटी येथे पोहचले आहेत. या सर्व घडामोडी सुरु असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत असेही शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही वेळापुर्वीच स्पष्ट केले आहे.

शिवसेना नेते आमदार गुलाबराव पाटील आणि रामदास कदम यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम, आमदार मंजुळा गावित, मुक्ताईनगरचे शिवसेना पुरस्कृत अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, अपक्ष हेही गुवाहटीत एकनाथ शिंदेंच्या गटात सामिल झाले आहेत, ते रात्री साडे आठ वाजता गुवाहटी येथे पोहचले आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांची भेट घेतली आहे. शिंदे यांच्या गुलाबराव पाटील पाया पडले तर कदम यांनी एका आमदाराची गळा भेट घेतली यानंतर सर्वांनी फोटोसेशनही केले.

संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले की,मुख्यमंत्री राजीनामा देणार नाहीत. ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी मुख्यमत्र्यांची वर्षावर भेट घेत त्यांना सदीच्छा दिल्या आहेत ते आमच्यासोबत आहे. मोहमाया सोडून मुख्यमंत्री मातोश्रीवर राहायला जात आहेत. त्यांना वर्षा बंगल्याचा मोह नाही असे स्पष्ट केले.