जावायाने केला सासूचा खुन मांडवखेल येथे हडकंप
जावायाने केला सासूचा खुन
मांडवखेल येथे हडकंप
नेकनुर – सय्यद खालेद
मुलीच्या घरी मांडवखेल ता. बीड येथे आलेल्या ४० वर्षीय महिलेचा खून करुन प्रेते जमीनीत पुरले होते या प्रकरणी हरवल्याची तक्रार तिच्या पतीने दिली होती हा गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. सदरील महिलेचे प्रेत जमीनीतुन बाहेर काढण्यासाठी बीडचे तहसीलदार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कबाडे, उप अधिक्षक सावंत, स. पो. नि. केंद्रे, दंगल पथक व पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी रवाना झाले आहे.
बीड येथील अंकुश नगर भागात राहणाऱ्या अलका हनुमंत जोगदंड वय ४० असुन दोन तारखेला तिच्या पतीने नेकनुर पोलीसात बायको हरवल्याची तक्रार दिली होती. सदरील महिला आपल्या मुली व जावई असलेल्या मांडवखेल येथे आली होती तिचा खून करुन प्रेताची विल्हेवाट लावल्या प्रकरणी जावई सचिन तुकाराम कदम वय ३२ वर्षे रा. मांडवखेल व तिचा वडील तुकाराम कदम वय ५० रा. मांडवखेल यांना अटक करण्यात आली आहे.नेकनुर हद्दीत स. पो. नि. केंद्रे यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात अपयश येत असल्याची चर्चा होत आहे. तर या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.