भाजपचा विधान परिषदेतही मविआला दे धक्का
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
दि. 20 जून :- राज्यसभेप्रमाणेच शेवटपर्यंत अतिशय उत्कंठावर्धक ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत पाच उमेदवार निवडून आणले. तर शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आले. काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यांचे चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला.
भाजपकडून प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय यांनी बाजी मारली. शिवसेनेचे सचिन अहिर, आमशा पडवी विजयी झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे विजयी झाले. काँग्रेसकडून भाई जगताप विजयी झाले, तर चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले.