महाराष्ट्र

एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

दि. 20 जून :- सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ येथे डॉक्टर कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. गुप्तधनाच्या मागे लागून कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

म्हैसाळ येथे पशुवैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लाप्पा व्हनमोरे यांच्या संपूर्ण कुटुंबांने आत्महत्या केली आहे. कुटुंबातील साऱ्या सदस्यांनी विष घेतल्याचे समजते. मृतांमध्ये डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा माणिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा) आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) यांचा समावेश आहे.

आत्महत्या केलेल्या पोपट वनमोरे यांच्या खिशात एक चिठी सापडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या चिठीत काही लोकांची नावे आणि सांख्यिकी आकडेवारी आहे. मृतांमध्ये डॉक्टर माणिक यल्लाप्पा व्हनमोरे यांच्यासह घरातील सदस्यांच्या समावेश आहे.​​​​​ कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.

सोमवारी सकाळी उशिरापर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याने ग्रामस्थांना संशय आला. यावेळी दवाखान्यातील कर्मचारी आणि ग्रामस्थांनी त्यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही मोबाइल उचलत नसल्याने त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता, कुटुंबातील सर्व जण मृत अवस्थेत आढळून आल्याने त्यांना धक्का बसला.