बीड

रोहितळ ग्राम रोजगार सेवकाला रॉडने मारहाण डोके फुटल्याने उपचारार्थ बीडला हलवले

तलवाडा.दि. ( प्रतिनिधी ) रोहितळ येथील ग्राम रोजगार सेवक जनार्दन शेषराव उनवणे यांना पाठीमागून येऊन एकाने लोखंडी रॉडने अचानक मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. उनवणे यांना गेवराई उपजिल्हा रुग्णालयातून प्रथमोपचारानंतर पुढील उपचारार्थ बीड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

       याबाबत मिळालेली माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील रोहितळ ग्रामपंचायत मधील ग्राम रोजगार सेवक जनार्दन शेषराव  उनवणे हे आपले काम करत असताना तेथे अचानक आलेल्या युवकाने उनवणे यांना शिवीगाळ करून, लोखंडी रॉडने मारहाण केली. यात जनार्दन उनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना पोलिसांकडून उपचारासाठी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डोक्याला गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी उनवणे यांना बीड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

  तलवाडा.पोलिसठाण्याचे  स.पो.नी.ऊणवने यांच्याशि संपर्क साधला आसता आमंच्याकडे फिर्याद देन्यासाठी राञी उशिरा प्रयमत कोनिही आले नसल्याचे सांगितले तर तशा प्रकारे फिर्याद देन्यास आले तर गुन्हा दाखल करू …स.पो.नि.ऊणवने.