भारत

सोनियांसाठी कन्या प्रियंकांचा महामृत्युंजय जप

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

18 Jun :- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आरोग्यासाठी उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यात येत आहे. सोनियांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी त्यांची कन्या मुलगी तथा काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी हा जप करत आहेत.

त्याची सुरुवात शनिवारी पक्षाचे राष्ट्रीय सचिव सत्यनारायण पटेल व इतर काँग्रेस नेत्यांनी पूजाअर्चा करुन केली. 5 पंडितांच्या मदतीने सुरू असलेला हा विधी सलग 11 दिवस चालेल. 2 जून रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांच्या श्वसननलिकेच्या खालच्या भागात इन्फेक्शनही झाले आहे. नाकातून रक्त आल्यानंतर 12 जून रोजी त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर प्रियंकांनी आईच्या उत्तम आरोग्यासाठी महाकाल मंदिरात महामृत्युंजय जाप करण्यास सांगितले होते. मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव रवी शुक्ला, रघु परमार आणि राष्ट्रीय सचिव सत्यनारायण पटेल यांच्यासह अन्य नेत्यांनी प्रार्थना करून विधीची सुरुवात केली. ती पूर्ण झाल्यानंतर प्रियंका उज्जैनला येऊ शकतात.