बीड

डुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

दि. 14 जून :- दुध घेवून जात असलेल्या शेतकऱ्यावर डुकराच्या झुंडीने हल्ला चढवला. यातील एका डुकराने शेतकऱ्यास चावा घेतला. त्यावेळी शेतकऱ्याने त्या डुकराला आपल्या कवटाळ्यात जखडून धरले. त्याला हालचाल करू दिली नाही, याच रस्त्याने काही शेतकरी जात असतांना त्यांना हा प्रकार दिसून आल्यानंतर त्यांनी त्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी धाव घेतली व त्या डुकराला जागीच ठार केले. ही घटना सकाळी 8 वा. मौजवाडी येथे घडली. डुकराला जखडून धरणाऱ्या या बहाद्दर शेतकऱ्याचं सर्वस्तरातून कौतूक केलं जात आहे. बीड तालुक्यातील मौजवाडी येथील 62 वर्षीय शेतकरी लक्ष्मण रामभाऊ ढेंबरे हे दुध गेवून जात असतांना डुकराच्या झुंडीने त्यांच्यावर हल्ला केला. यातील एका डुकराने त्यांना चावा घेतला. यावेळी शेतकऱ्याने डुकराला आपल्या कवटाळ्यात जखडून ठेवले, त्याला हालचाल करू दिली नाही, तितक्यात याच रस्त्याने प्रभाकर ढेंबरे, सुरज जाधव, भिमा जाधव, अशोक गंगाराम जाधव आदी जात होते. त्यांनी त्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी धाव घेवून डुकराच्या तावडीतून शेतकऱ्याला सोडले. यावेळी शेतकऱ्याने डुकराला जीवे मारले. लक्ष्मण रामभाऊ ढेंबरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डुकराशी झुंज करून त्याला काहीवेळ आपल्या कवटाळ्यात जखडून ठेवणाऱ्या या बहाद्दर शेतकऱ्याचं सर्वस्तरातून कौतूकही केलं जात आहे. दरम्यान मौजवाडी शिवारामध्ये राणडुकराने मोठा उच्छांद माजवला आहे. हे रानडुकरं शेतकऱ्यावर सातत्यानं हल्ला करत पिकाची नासाडीही करत आहेत. रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.