राजकारणमहाराष्ट्र

अनिल देशमुख आणि नवाब मलिकांची हाय कोर्टात धाव

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 जून :- विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाचे हक्क मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी राज्यसभेत मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी मलिक आणि देशमुख यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, राज्यसभा निवडणुकीत त्यांना मतदान करता आले नाही. त्यानंतर आता विधान परिषदेसाठी मतदानाचा हक्क मिळावा यासाठी मलिक आणि देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात महाविकास आघाडीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख सध्या कोठडीत आहेत. येत्या 20 जूनला विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी या दोघांनी न्यायालयात धाव घेतली असून, त्यांच्या याचिकेवर 15 जून रोजी सुनावणी होणार आहे. तसेच मलिकांच्या सुधारित याचिका दाखल करण्याच्या परवानगीबाबत देखील थोड्याच वेळात निर्णय होणार आहे.