बीड

बीड जिल्ह्यात मनाई आदेश लागू

11 Jun :- बीड जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)) (3) कलमान्वये बीड

जिल्हा हद्दीत दि. 22 जून 2022 रोजीचे 00:00 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू राहील, असे अपर जिल्हा दंडाधिकारी दयानंद जगताप यांनी आदेशाद्वारे कळवले आहे.

या कालावधीमध्ये शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास खालील गोष्टी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

शस्त्रे, सोटे, काठी, तलवार, बंदुक, जवळ बाळगणार नाहीत. काट्या, लाठ्या शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तू जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाहीत, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा फोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळा करुन ठेवणार नाहीत किंवा बाळगणार नाहीत किंवा तयार करणार नाहीत.

आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करणार नाही, सभ्यता, नीतिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू जवळ बाळगणार नाहीत, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मूल्यांच्या विरुद्ध असेल किंवा देशाचा मान

व सार्वभौमत्व यांना इजा पोहोचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहोचवणारी असेल आणि जाहीरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करणार नाहीत. व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणूक, मोर्चा काढता येणार नाही.