बीड

अखेर बीड ला मिळाले नवीन पोलीस अधीक्षक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 जून :- अखेर बीडच्या रिक्त असलेल्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड येथील मानवी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक असलेल्या नंदकुमार ठाकूर यांना बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. आर. राजा यांची बदली झाल्यानंतर महिनाभरापासून हे पद रिक्त होते. सध्या या पदाचा अतिरिक्त पदभार पंकज देशमुख यांच्याकडे होता. आता नंदकुमार ठाकूर येत्या दोन दिवसात पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे स्वीकारणार आहेत.