क्राईमबीड

चौसाळा शहर पन्नास टक्के बंद

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

07 जून :- चौसाळा येथील शिवसेनेचे युवा नेते तथा भिमाशंकर शुगर मिल्सचे चेअरमन नितीन लोढा यांच्यावर गुजांळ नावाच्या व्यक्तीने पोखरी(कोयता)सारख्या शस्ञाने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चौसाळा येथे घडली या हल्ल्यात लोढा जखमी झाले असुन त्यांना बीड येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पंरतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बीड तालुक्यातील चौसाळा येथील शिवसेनेचे युवा नेते तथा भिमाशंकर शुगर मिल्सचे चेअरमन नितीन लोढा हे आपल्या घरामध्ये असताना बाहेर आलेल्या गुजांळ नावाच्या व्यक्तीने त्यांना बाहेर येण्यास सांगितले त्यावर लोढा यांनी उद्या भेटु असे सांगितले माञ तो व्यक्ती पुन्हा पुन्हा लोढा यांना बाहेर बोलावत होता त्यामुळे लोढा घराबाहेर आले असता गुजांळ नावाच्या व्यक्तीने हातातील धारदार शस्ञाने नितीन लोढा यांच्या डोक्यावर आणी डोळयाजवळ वार केले या हल्ल्यात नितीन लोढा जखमी झाले असुन त्यांना तात्काळ बीड येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पंरतु त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे .सदरील घटनेनंतर पोलिसांनी एका धाब्यावरून गुजांळ नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतल्याचे सुञांनी सांगितले. नितीन लोढा यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेने खळबळ उडाली असुन संबधीत व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला का केला याचे कारण माञ समजु शकले नाही. त्या नंतर चौसाळा गाव हे पन्नास टक्के बंद झाल्याचे समजले. अधीक तपास नेकनुर पोलीस करत आहेत.