कधी लागणार बारावीचा निकाल
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
07 जून :- राज्यातील सर्व पालक आणि विद्यार्यथ्यांना उत्सुकता लागलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या दु्पारी एक वाजता लागणार आहे. तशी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. यंदा कोरोनाची साथ ओसरल्यामुळे दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. अखेर या सर्वांची प्रतीक्षा संपली असून उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे.
राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यानुसार बारावीचा निकाल बुधवारी लागणार आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवर निकाल जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचे नाव देऊन आपला निकाल बघता येईल.