क्राईमबीड

कत्तलखान्याकडे जाणाऱ्या सहा जनावरांची पंकज कुमावत यांच्या पथकाने केली सुटका

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

03 जून :- केज तालुक्यातील साळेगावच्या जनावरांच्या आठवडी बाजारातून जनावरे खरेदी करून ती एका वाहनातून कत्तलीसाठी कत्तलखान्यांकडे घेऊन जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळताच त्यांच्या पथकाने कारवाई करून सदर वाहन ताब्यात घेऊन जनावरांची सुटका करीत वाहन चालकासह तिघांना ताब्यात घेतले.

या बाबतची माहीती अशी की, दि.२ मे रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत याना एका गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, एका टेम्पोतून साळेगाव येथील आठवडी बाजारातून सहा जनावरे कत्तल करण्यासाठी कत्तलखान्याकडे घेऊन जात असल्याची माहिती प्राप्त होताच; त्यांनी त्यांच्या पथकातील पोलीस नाईक विकास चोपने, सचिन अंहकारे, संजय टुले आणि शिवाजी कागदे यांच्या पथकाने केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सापळा रचून २ मे गुरुवार रोजी दुपारी १२:३० वा. साळेगाव कडून केजकडे येत असलेले वाहन क्र. (एम एच-२३/ए यु-३३३२) हे ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्यात चार गाई, एक कालवड आणि एक गोरा अशी सहा जनावरे आढळून आली.

पोलीस हेड कॉन्स्टेबल रंगनाथ बांगर यांच्या फिर्यादी वरून वाहन चालक शेख तौफीक अल्ताफोद्दीन रा. नेकनूर, मोसीम शेख रा. सायगाव आणि सलीम रा. घांटनांदुर यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. २०८/२०२२ नुसार प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनीयम १९६० चे कलम ११(१), (ड), ११ (१) (ई) सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनीयम १९७६ चे कलम ५ (अ) (१), ५ (२) ११ सह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम ११९ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.