बीड

पंकजा मुंडे आठवणीने व्याकूळ

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 Jun :- गोपीनाथ मुंडे आज आमच्यात नाहीत. हा दिवस आमच्यासाठी काळा दिवस आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखे गोपीनाथ मुंडे आमच्यातून निघून गेले, अशा भावना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या. त्या भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथगडावर आयोजित स्मृती कार्यक्रमात बोलत होत्या. या कार्यक्रमाला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान होते.

पंकजा म्हणाल्या, मध्यप्रदेशासारखेच महाराष्ट्रातील ओबीसींना आरक्षण द्यावे. शिवराजसिंह चौहान यांनी ओबीसी समाजाला आरक्षण दिले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि माझे नाते निर्माण झाले आहे. गोपीनाथगडावर आपण आलो आहात ते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यामुळेच. शिवराजसिंह आज गोपीनाथ गडावर आले आहेत.

शिवराजसिंह यांनी ओबीसी समाजाला आरक्षण दिले आहे. हा दुग्धशर्करा योग आहे. त्यांचा आपण येथे सत्कार करू. गोपीनाथ मुंडे आज आमच्यासोबत नाहीत. मात्र, त्यांचे आशिर्वाद आमच्यासोबत आहेत. ऊसतोड मजुराचा मुलगा देशाच्या केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहचतात ही अभिानास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

पंकजा म्हणाल्या की, शिवराजसिंह चौहान यांच्या येण्याने दुःखाच्या दिवशीही माझ्या चेहऱ्यावर हासू आले. खरे तर तुमच्यासारखे ओबीसी आरक्षण देण्यासाठी प्रयत्न आम्हाला करता यावा, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले. पुढे त्या म्हणाल्या, माझ्या पराभवाने मला देशपातळीवरील राजकारणात मोठे पद दिले. माझा पराभव मला समाजसेवेसाठी फायदेशीर ठरला. कर्माशिवाय धर्म नाही, धर्माशिवाय कर्म नाही, मी सत्तेसाठी नाही तर आता सत्यासाठी लढणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.