बीड

मोठी बातमी! नमाजानंतर दगडफेक; बाजारपेठ बंद

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 Jun :- कानपूरच्या बेकनगंज भागात शुक्रवारच्या नमाजानंतर मोठा राडा झाला. बाजार बंद करण्याच्या घोषणेमुळे दोन समुदायांत तुफान दगडफेक झाली. त्यानंतर झालेल्या संघर्ष नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर उपस्थितांनी दगडफेक केली. हा संमिश्र लोकसंख्येचा भाग आहे. त्यामुळे स्थिती तणावपूर्ण बनली आहे.

या हिंसाचाराची सुरुवात मुस्लिम नेते हयात जफर हाश्मी यांच्या बाजारपेठ बंद ठेवण्याच्या आवाहनामुळे झाली होती. तत्पूर्वी, भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी टीव्ही डिबेटध्ये प्रेषित पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्र विधान केल्यामुळे मुस्लिम समुदाय नाराज होता.

या विधानाच्या निषेधार्थ त्यांनी बाजारपेठ बंदही ठेवली. पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील परेड चौकात शेकडो जण जमले होते. दुपारी 3 च्या सुमारास दोन्ही समुदायाचे लोक एकमेकांपुढे आले. त्यानंतर दगडफेक सुरू झाली. त्यात अनेकजण जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.