महाराष्ट्र

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 Jun :- भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. चिथावणीखोर वक्तव्ये करणे, समाजा-समाजात तेढ निर्माण करणे असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, धनगर संघटनांच्या त्यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. रविंद्र सखाराम पांडुळे या व्यक्तीने पडळकरांच्या विरोधात तक्रार दिली आहे. गोपीचंद पडळकर यांनी मंगळवारी चौंडी येथे केलेल्या भाषणानंतर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी राज्यभरात अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. मात्र कर्जतमध्ये गोपीचंद पडळकरांनी केलेला राजकीय ड्रामा हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त आमदार रोहित पवार यांच्याकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी अनेक नेतेही चौंडीत दाखल होत होते. मात्र या कार्यक्रमावर गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला. रोहित पवारांना आत्ताच कशी अहिल्याबाईंची आठवण झाली, रोहित पवार काय अहिल्याबाईंचे वंशज आहेत का? असा सवाल पडळकरांनी वारंवार विचारले.

गोपीचंद पडळकर यांनीही तिथे जाऊन अहिल्याबाईंचे दर्शन घेण्याचा आग्रह धरला. सदाभाऊ खोतही यावेळी त्यांच्यासोबत होते. मात्र पोलिसांनी पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना चौंडीत जाताना वाटेतच अडवले आणि तिथेच वादाची ठिणगी पडली. त्यावरही पडळकरांनी राष्ट्रवादीने हा कार्यक्रम हायजॅक केल्याची टीका त्यांनी केली. या सर्व घटना क्रमानंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर कर्जतमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. काही धनगर संघटनांनीच पडळकरांविरोधात तक्रार केली आहे.

पडळकरांनी राज्य सरकार आणि राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला. पोलीस राष्ट्रवादीच्या दबावाखाली काम करत आहेत. रोहित पवाराना कार्यक्रम घ्यायला परवानगी मिळते, पण आम्हाला तिथे जाताना अडवलं जातं, हा कुठला न्याय, असा सवाल पडळकरांनी विचारला. इतके नव्हे तर त्यांनी इतरही अनेक मुद्द्यांवरूनही त्यांनी पवारांना टार्गेट केले. मात्र पडळकरांच्या या वागणूकीवर आता काही धनगर संघटनांच त्यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहे.