राज्यात पुन्हा कोरोनाचे वारे; 11 ठिकाणे हॉटस्पॉट, प्रशासनाला धडकी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
1 Jun :- राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून, रुग्णात वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. मुंबईतील 11 ठिकाणे कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मात्र, यामुळे घाबरून न जाता नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मुंबईतील 11 वार्ड कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. या परिसरात कोरोनाची जास्त प्रकरणे आढळून येत आहेत. यामुळे मुंबईत कोरोनाच्या टेस्टचे प्रमाण वाढवणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. इथे वारंवार कोरोनाची नवीन प्रकरणे आढळून येत आहेत. इतकेच नाहीतर या वॉर्डांमधील कोरोना रुग्णांचा वाढीचा दर मुंबईच्या सरासरी वाढीच्या दरापेक्षा जास्त आहे. ही बाब चिंतेची आहे, असेही प्रशासनाने म्हटले आहे. गेली अनेक दिवस 24 तासांत 300 हून अधिक रुग्ण सापडत असल्याने प्रशासनाकडून खबदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात येत आहे.
गेली अनेक दिवस मुंबईच्या काही भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, असे असताना प्रशासनाकडून जास्त रुग्ण संख्या असलेल्या परिसरामध्ये पुढील भागाचा समावेश आहे, वांद्रे, खार, कुलाबा, परळ, अंधेरी, एलफिंस्टन, माटुंगा, ग्रँट रोड, गोरेगाव, चेंबूर आणि कुर्ला या परिसरात कोरोनाचे नवे रुग्ण समोर येत आहेत.
कोरोनाचे राज्यात सध्या जवळपास 3,475 सक्रिय रुग्ण आहेत. दिवसभरात कोरोनाचे 712 रुग्ण समोर येत असताना यातील जवळपास 300 रुग्ण हे मुंबईतील आहेत. यामुळे राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढ होणार की काय असे चित्र तयार होऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.