महाराष्ट्र

राज्यात ‘एनडीआरएफ’च्या तुकड्या होणार तैनात

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 May :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. यंदा पावसाळ्यात प्रथमच संभाव्य आपत्ती निवारण्यासाठी एनडीआरएफच्या 9 तुकड्या 7 जिल्ह्यांमध्ये मान्सूनपुर्वी तैनात करण्यात येणार आहेत.मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून पावसाळ्यासाठी त्यांनी केलेल्या नियोजनाची माहिती घेतली असून त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी समाधान व्यक्त करीत या नियोजनावर शिक्कामोर्तब करीत बैठकीत सूचना केल्या आहेत.

या वर्षीचा मान्सून 16 मे रोजी अंदमानमध्ये दाखल झाला. त्यानंतर तो 29 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळे आता राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात 6 ते 10 जून या काळात मान्सून हजेरी लावेल असा अंदाज वर्तविला आहे. त्या धर्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आजची मान्सूनपूर्व आढावा बैठक महत्वाची आहे.

विशेषत: पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढत असून ऐनवेळी मदत व बचावकार्य करण्याची वेळ येऊ नये, म्हणून प्रथमच एनडीआरएफच्या 9 तुकड्या 7 जिल्ह्यांमध्ये अगोदरपासूनच तैनात करण्यात आल्या आहेत. मान्सूनपूर्व आढावा बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापनाने त्याबाबतची माहिती दिली.

मुंबईत प्रत्येकी दोन तर कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर येथे प्रत्येकी एक टीम 15 जूनपासून पोहोचतील. याच पद्धतीने राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे एनडीआरएफची एक तुकडी नांदेड आणि एक तुकडी गडचिरोली येथे 15 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत तैनात करण्यात येईल, असेही या बैठकीत सांगण्यात आले.