महाराष्ट्र

राज ठाकरे लीलावती रुग्णालयात

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 May :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. पायाचे दुखणे वाढल्याने राज ठाकरेंवर उद्या शस्त्रक्रिया केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना पायदुखीचा त्रास जाणवत होता. उद्या त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

पुण्यातील सभेमध्ये राज ठाकरे यांनी आपल्याला गेल्या काही दिवसांपासून पायदुखीचा त्रास जाणवत असल्याचे सांगितले होते. भाषणामध्ये त्यांनी हिप बोनवर शस्त्रक्रिया होणार असल्याचे म्हटले होते. त्यासाठी आज राज ठाकरे लीलावती दाखल झाले असून, उद्या त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

मनसेने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणशिंग फुंकले आहे. तसेच त्यांनी मुंबईतील सभेत मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच पेटल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर ठाणे, औरंगाबाद आणि पुण्यातील सभा देखील चांगल्याच गाजल्या होत्या. पुण्यातील सभेत राज ठाकरे यांनी आपल्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया होणार असल्याचे म्हटले होते.