सरकारी कर्मचाऱ्यांची आठवड्याची गैरहजरी पडणार-राज्य सरकार
मुंबई :निवडक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सरकारी कामकाज सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्यानंतर आता आठवड्यातून किमान एक दिवस सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा आठवड्यातून एक दिवसही कार्यालयात हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण आठवड्याची गैरहजेरी लागणार असल्याचे आदेश आज राज्य सरकारने जारी केले.
महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील उपस्थितीबाबतचा आदेश काढला आहे. या आदेशाची अंमलबजावणी ८ जूनपासून करण्यात येणार आहे. कर्मचारी परस्पर गैरहजर राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. अनेक अधिकारी, कर्मचारी लॉकडाऊनच्या काळात कार्यालयात येत नसल्याचे निदर्शनास आले.