बीडच्या भूमिपुत्राची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या ‘जिल्हाध्यक्षपदी’ निवड
बीड : वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाने जागतिक पर्यावरण दिनी आपल्या पुढील पाच वर्षांकरिता (२०२०-२०२५) महाराष्ट्र राज्यभरातील सर्व जिल्हाध्यक्षांची पदभार निवड जाहीर केली आहे. राज्यात पुढील पाच वर्षात पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्याचे कामास गती मिळण्यासाठी या सर्वांनी आपापल्या ठिकाणी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा मोरे यांनी यावेळी व्यक्त केली.आगामी पाच वर्षात मंडळाच्या वतीने राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचच्या जिल्हाध्यक्षपदी कचरू चांभारे यांची निवड झाली आहे. हे जि.प.प्राथमिक शाळा मन्यारवाडी येथे प्रभारी मुख्याध्यापक आहेत.निसर्गप्रेमी म्हणून त्यांची ओळख आहे.निसर्गाशी संबंधित विषयावर त्यांनी भरपूर लेखन केलेले आहे.पर्यावरण विषयी परिषद / संमेलनात त्यांचा सक्रीय सहभाग असतो.धरतीचे आपण लेकरं आहोत ,धरणीमाईसाठी काम करू असा मानस त्यांनी व्यक्त केला.लवकरच जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणीचे गठन करण्यात येईल.
राज्यभरातील सर्व नूतन जिल्हाध्यक्षांच्या निवडीचे उपाध्यक्ष विलास महाडिक, प्रमोद काकडे, सचिव धीरज वाटेकर, कार्यालयीन सचिव प्रमोद मोरे यांनी अभिनंदन केले आहे.रोटरी परिवार ,शिक्षण क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील मित्रपरिराकडून मु.चांभारे सरांच्या निवडीचे स्वागत करून अभिनंदन केले आहे.