भारत

नामांतरास विरोध; मंत्र्याचे घर जाळले, पोलिसांवरही दगडफेक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 May :- आंध्र प्रदेशाच्या कोनसीमा जिल्ह्याचे नाव बदलण्याच्या मुद्यावरुन मंगळवारी मोठा हिंसाचार झाला. संतप्त जमावाने या प्रकरणी पोलिसांवर दगडफेक करुन वाहनांची जाळपोळ केली. एवढेच नाही तर परिहवन मंत्री पी. विश्वरुप यांचे अमालापूरम शहरातील घरही पेटवून दिले.

पोलिसांनी मंत्री व त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित स्थळी पोहोचवले आहे. निदर्शकांनी पोलिसांचे एक वाहन व एका शैक्षणिक संस्थेची बसही पेटवून दिली आहे. या घटनेत जवळपास 20 पोलिस दगडफेकीत जखमी झालेत. 4 एप्रिल रोजी आंध्र प्रदेश सरकारने पूर्व गोदावरी जिल्ह्यातून कोनासीमा जिल्हा काढला.

अलीकडेच बी.आर.आंबेडकर यांच्या नावावरुन या जिल्ह्याचे नाव बदलण्यात आले. त्याला विरोध सुरू झाला. कोनसीमा साधना समितीने नाव बदलण्याच्या प्रस्तावावर आक्षेप घेत जिल्ह्याचे नाव कोनसीमा असेच ठेवण्याची मागणी केली. समितीने मंगळवारी डीएम हिमांशू शुक्ला यांना निवेदन सादर करून जिल्ह्याचे नाव बदलण्यास विरोध केला होता. यादरम्यान अमलापुरम शहरातील मुम्मीदिवरम गेट, घंटाघर आणि इतर ठिकाणी समितीच्या शेकडो लोकांनी निदर्शने केली.

निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी काही तरुण पळून गेले, पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला. जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही लाठीचार्ज केला. त्यानंतर हिंसाचार उसळला

राज्याच्या गृहमंत्री तनेती वनिता यांनी राजकीय पक्षांवर जिल्ह्यातील हिंसाचाराचा आरोप केला आहे. काही राजकीय पक्ष आणि असामाजिक तत्वांनी मिळून हिंसाचार घडवून आणल्याचे ते म्हणाले. या घटनेत सुमारे 20 पोलिस कर्मचारी जखमी होणे दुर्दैवी आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू आणि जो कोणी दोषी असेल, त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.