सिनेमा,मनोरंजन

बबिताजी घेणार मालिकेतून एक्सिट?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 May :- छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारांना अलीकडेच एक धक्का मिळाला होता. तो म्हणजे मालिकेतील लोकप्रिय पात्र तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी या मालिकेचा निरोप घेतला. ही बातमी समजल्यावर चाहते चांगलेच नाराज झाले होते. आता ही नाराजी असतानाच मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.

या मालिकेतील आणखी एक लोकप्रिय पात्र बबिताजी म्हणजेच मुनमुन दत्ताही मालिका सोडत असल्याचे वृत्त आहे.शैलेश लोढांनंतर आता मुनमुन दत्ताही शोमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. याआधीही मुनमुन शोमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा झाली होती. मात्र त्यावेळी या सगळ्या अफवा असल्याचे मुनमुनने स्पष्ट केले होते.

वृत्तानुसार, मुनमुन दत्तासोबत ‘बिग बॉस ओटीटी सीझन 2’ च्या निर्मात्यांनी संपर्क साधला असून तिला या शोची ऑफर देण्यात आली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शोमधील बबिताजी या पात्राची प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. तिची ही लोकप्रियता लक्षात घेऊन बिग बॉस ओटीटीच्या निर्मात्यांनी तिला शोची ऑफर दिली आहे. पण मुनमुन या शो मध्ये असेल का याबाबत अद्याप अधिकृतरित्या माहिती समोर आलेली नाही. आता मुनमुन या शोमधून खरंच बाहेर पडणार का हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.