बीड

बीड;आज 10 रुग्णांना कोरोना मुक्तीची पावती

बीडवासीयांना आनंद देणारी बातमी म्हणजे सध्या बीडची कोरोना मुक्ती कडे वाटचाल चांगली सुरु झाली आहे.आज बीड जिल्हा रुग्णालयातून 8 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहे तर परळी रुग्णालयातून 2रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आहे.

बीड मधील आरोग्य विभागाच्या परिश्रमामुळे आणि सूक्ष्म दक्षतेमुळे आत्ता पर्यंत बीड जिल्ह्यातून 50 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या बीड जिल्ह्यात फक्त 11
बाकी राहिले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत तर यातील 2 रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत.लवकरच बीड जिल्हा कोरोनामुक्त होईल असे चित्र सध्या दिसू लागले आहे.
काळजी घ्या… गर्दी टाळा…स्वस्थ रहा …