महाराष्ट्र

आव्हाडांचा हल्लाबोल! इतिहास पोखरून निष्कारण आगी लावण्याचा…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 May :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी नदीपात्राच्या सभेविषयी स्पष्टीकरण देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. एकूणच सध्याचे हवामान पाहता कोणत्याही वेळी पाऊस पडेल, असे चिन्ह आहे. मी म्हटले निवडणुका नाहीत, उगाच कशाला भिजत भाषण करायचे, असे म्हणत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या पवार यांच्यावर टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर येण्यास सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. “एवढे दिवस सभा घेताना काय पाऊस वाटत होते का? शिवाजी पार्कात सभा घेतली तेव्हा काय छत्री घेऊन उभे होते का? अफजल खान, औरंगजेब, भोंगा ह्यापेक्षा पेट्रोल-डिझेल गॅसची दरवाढ, बेरोजगार झालेली तरुण पोरं, त्याच्यावरती बोलूयात. 300 ते 350 वर्ष जुना इतिहास पोखरून निष्कारण आगी लावण्याचा काम करू नये, असा हल्लाबोल आव्हाड यांनी राज ठाकरेंवर केला आहे.

पुढे आव्हाड म्हणाले की, राज ठाकरे यांच्या भाषणालाच काही अर्थ उरलेला नाही, त्यात काही मटेरियल नाही आहे. बोलायचे म्हणून बोलतात, लोकं ऐकायला जातात, कॉमेडी शो प्रत्येकालाच आवडतो, असे म्हणत आव्हाडांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याआधी राज यांच्यावर टीका करताना आव्हाड म्हणाले की, कुणी सापळा रचला? कमी काय केले, हे त्यांचे त्यांना माहित आहे, आम्हाला त्या वादात पडायचे नाही.

तुम्ही अयोध्याला जा, नका जाऊ, तुम्ही कुठे जाता. काय करता याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. तुमच्या भोंग्यांचा राजकारण झाले याचा मला अभिमान आहे, महाराष्ट्र धर्म जागा झाला आणि त्यांनी ओळखले की हे फक्त दंगली घडविण्यासाठी करतात, 3 तारखेला काहीही झाले नाही. पण तुमच्या त्या एका कृत्यामुळे महाराष्ट्रातील हिंदू धर्माच्या तमाम काकड आरत्या बंद झाल्या, असा घणाघाण आव्हाडांनी केला होता.