अबब…! पेट्रोल ९.५ रुपयांनी तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
21 May :- जनतेला दिलासा देत केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. ही माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९.५ रुपये आणि डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होणार आहेत.
याशिवाय, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ९ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर (१२ सिलेंडरपर्यंत) २०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, यामुळे आपल्या माता-भगिनींना मदत होईल.