नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
21 May :- महाविकास आघाडीचे नेते मंत्री नबाव मलिक यांचे डी-गँगशी संबंध होते त्यांनी मनी लाँड्रिंग केल्याचे निरीक्षण कोर्टाचे नोंदवले आहे. ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रानंतर कोर्टाने हे निरिक्षण नोंदवलेले आहे. नवाब मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खानच्या संपर्कात होते, असे देखील सांगण्यात येत आहे. डी-गँगशी संबंध ठेवूनच गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवली. असे कोर्टाचे म्हणणे आहे.
नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने दोषारोपपत्र दाखल केले होते. त्या दोषारोपपत्राला कोर्टाने स्वीकारले आहे. यामध्ये ईडीने जे काही दावे केले होते, ते पाहून प्रथमदर्शनी नवाब मलिक हे डी-गँगशी जोडले गेलेले होते. गोवावाला कंपाऊंड मिळवण्यासाठी त्यांनी एक कट रचला. त्यासाठी त्यांनी वारंवार हसीन पारकर सोबत बैठका घेतल्या, आणि कुठे तरी त्यांनी मनी लाँड्रिंग केले, असे कोर्टाने म्हटले आहे.
सरदार शहावली खान त्याचबरोबर मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधामध्ये पुढच्या कारवाईला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे येत्या काळात नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गोवावाला कंपाऊंड मिळवण्यासाठी गुन्हेगारी स्वरुपाचा कट मंत्री नबाव मलिक यांनी रचला त्यांना बरेच डी-गँगशी संबंधित लोकांसोबत ते जोडले गेलेले होते, असे प्राथमिक निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. रोकडे यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले आहे. नवाब मलिक यांचा दाऊदच्या गँगमधील लोकांसोबत संबंध असल्याचे निरीक्षण नोंदवले गेल्याने आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.