नवनीत राणांचा नवा दावा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
20 May :- मला जेलमध्ये टाकणारे हेच लोक होते असे संजय राऊतांसमोर म्हणाले, तेव्हा ते निरुत्तर झाले, अशी टीका पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. हनुमान चालिसावरून रान पेटवल्यानंतर राणा दाम्पत्याला तुरुंगवास भोगावा लागला. जेलमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा राणा आक्रमक झाल्या आहेत. आता राऊत काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.
नवनीत राणा म्हणाल्या की, संजय राऊत समोर असताना एक मुलगी माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली की, मॅडम महिलेला पुढे येऊ दिले जात नाही असे का होते? मी तिला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांंना उद्देशून म्हणाले की, एकटीला पाहून महिलेला डाॅमिनन्ट करणारे हेच लोक होते. तेव्हा संजय राऊत यांच्याकडे उत्तर नव्हते. ते निरुत्तर झाले.
नवनीत राणा म्हणाल्या की, संजय राऊत लडाखमध्ये येणार म्हणून मी तेथे गेले नसते, तर माझ्या प्रोफेशनशी मी अन्याय केला असे झाले असते आणि मी तसे करु शकत नव्हते. त्यामुळेच मी लडाखमध्ये गेले. संजय राऊतांवर नव्हे, तर माझ्यावर अत्याचार झाले आहेत. मला जेलमध्ये टाकले गेले. तरीही मी माझे कर्तव्य करीत आहेत. मी माझी लढाई लढतच आहे. माझे विचार महाराष्ट्राच्या विकासासाठी आहेत.
नवनीत राणा म्हणाल्या की, संजय राऊत आणि आम्ही एकत्र लढाखमध्ये जरी गेलो असलो तरीही आमची विचारांची लढाई आहे. राजकीय लढाई आहे. म्हणून त्यांना टाळणे हे माझ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत नाही. त्यांना जे बोलले ते आजही कायम आहे. संस्कृती आणि परिपक्वता आम्ही जपली, त्यांनी नाही. राणा म्हणाल्या की, माझ्यासोबत जे घडले त्याबद्दल मी संसदीय समितीसमोर आधीही बोलले आणि आणखीही आवाज उठवणार आहे. माझी लढाई वैचारीक आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी असून ही लढाई करप्शनच्या लंकेविरुद्ध आहे आणि ती राहणारच आहे.