सिनेमा,मनोरंजन

सोनू निगमने फोडले नव्या वादाला तोंड; नेटकऱ्यांमध्येही जुंपली

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

20 May :- सोनू निगम नेहमी वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो. नवरात्रात मटण बंदी कशाला? असे म्हणत त्याने नव्या वादाला तोंड फोडले आहे. कारण ज्या व्यक्तीचे मटणाचे दुकान असते, ते त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. मग नवरात्रीमध्ये त्याने त्याचे दुकान का बंद ठेवायचे. असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सोनू निगमच्या काही दिवसांपूर्वीच्या एक मुलाखतीतील व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यात सोनू म्हणतो की, नवरात्रीदरम्यान मटण बंदी कशासाठी? नवरात्रीदरम्यान मटणाची दुकाने बंद करणे, चुकीचे आहे. काही लोक मटण विकून पोट भरतात. हे त्यांचे काम आहे, त्यावर त्यांचे पोट अवलंबून आहे. त्यांची दुकाने तुम्ही बंद करू शकत नाही, असे सोनू व्हिडिओत म्हटले आहे. जय श्रीराम म्हणण्यावरही तो बोलला आहे. मी काही भक्त नाही की, तुम्ही म्हणता म्हणून मी जय श्रीराम म्हणेल, असेही तो व्हिडिओत म्हणतोय. त्याच्या मुलाखतीचा हाच भाग व्हायरल होतोय आणि लोकांनी त्याला ट्रोल करणे सुरू केले आहे.

सोनू निगमचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. नवरात्रीत मटण बंदी करू नका, मी जय श्री राम म्हणायला भक्त नाही, या विविध वक्तव्यावरुन नेटकरी त्याला सुनावताना दिसत आहेत. मात्र, यातील काही लोकांनी सोनू निगमच्या बाजूनेही सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. सोनू निगमने असे वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांने वादग्रस्त वक्तव्य ही नेहमी चर्चेत असतात.

सोनू निगमने 2017 मध्ये मशिदीवरील भोंग्याद्वारे होणाऱ्या अजानला विरोध केला होता. त्यानंतर होणाऱ्या टीकेवरून सोनूने सारवासारव करत सोनूने पत्रकार परिषद घेत यावर स्पष्टीकरण दिले होते. मी केवळ सामाजिक विषयावर बोललो होतो, धर्मिक नाही असे म्हणत प्रकरण सावरण्याचा प्रयत्न त्याने केला होता. तर कोणत्याही धर्माचा मी विरोध केलेला नाही. मी धर्मनिरपेक्ष आहे. मंदिर आणि गुरुद्वारासंदर्भातही हेच बोललो होते असेही त्यांनी यावेळी म्हटले होते.

अजान, नवरात्री, जय श्री राम याशिवाय सोनू निगमने राधे माँच्या पेहरावावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. सोनू निगमने आपल्या वक्तव्यात ‘राधे मा’ची तुलना ‘काली मा’शी केली होती. आई कालीही लहान कपडे घालायची, पण तिची कोणीही विचारपूस केली नाही. असे वादग्रस्त वक्तव्य त्याने केले होते. सोनू निगमच्या या विधानाला प्रखर विरोधही झाला होता.