बीड

‘या’ कारणामुळे केज तालुक्यातील मुख्याध्यापक निलंबित

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

20 May :- तालुक्यातील ताबंवा येथील दोन शिक्षण संस्थाच्या  पदाधिकारी व मुख्याध्यापक यांचेवर  गुडीपाडव्या दिवशी संध्याकाळी गुडी उतरण्याच्या वेळी लाचलुचपत विभागाने टाकलेल्या ट्रॅप मध्ये सापडलेला सानेगुरुजी माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक उद्धव माणिकराव कराड यास बीडचे साहाय्यक समाज कल्याण आयुक्त डाॅ. सचिन मडावी यांनी तडकाफडकी निलंबित केले असून, निलंबनाच्या काळात त्याला केवळ निर्वाह भत्यावर समाधान मानून अंबाजोगाई येथील आनंद नगराची आश्रम शाळा मुख्यालय देण्यात आल्याची माहीती डाॅ. सचिन मडावी यांनी या दिली. बाबतची सविस्तर माहिती अशी की, केज आणि ताबंव्याच्या लवणात ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षण आणि चरितार्थाचा बहाणा पुढे करुन समाजाच्या नावावर स्वतःची गर्दाडं भरणारा , अनेक कर्मचार्यांचे संसार उध्वस्त करणारा आणि वेळोवेळी वेगवेगळ्या भूमिकेत साकार होणारा ऊसतोड कामगार विकास मंडळाचा अध्यक्ष तथा मुख्याध्यापक उद्धव कराड यास ताबंवा येथील गणेश माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक अनंत बाबुराव हंगे  व संस्थासचिव अशोक हरीभाऊ चाटे  यांचे सोबत मुख्य मार्गदर्शक तथा मध्यस्थी  म्हणून  १२लाख व सेवानिवृत्तीच्या अर्ध्या लाभातील पहीला दिड लाखांचा हप्ता घेतांना रंगेहात पकडले होते. लाचलुचपत विभागाच्या झापडीनंतर उद्धव कराड याचे खरे रुप समोर आले आहे. कराड यांने पाहीजे तेंव्हा संस्थाचालक,कधी संस्थेचा अध्यक्ष,कधी शाळेचा मुख्याध्यापक तर कधी लाॅयर च्या भुमिका वटवून स्वतःच्या संस्थेतल्या अनेक कर्मचा-यांचे संसार देशोधडीला लावले आहेतचं परंतु परिसरातील अनेक संस्थाचालकांना ही मार्गदर्शन करुन शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात ईमाने-ईतबारे काम करणा-यांची वाट लावण्याचे महापाप केले असल्याचे समोर आले आहे. शिक्षणातल्या या महापाप्याची पहीली पायरी म्हणजे त्याला मुख्याध्यापक पदावरुन निलंबित करण्यात आले असून,तो संस्थेचा अध्यक्ष असल्यामुळे लवकरंच तो प्रस्तुत पदावरुन देखील पदच्युत होण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे,लाच प्रकरणात उद्धव कराड याने आपल्या वकीलीचाही बोल्ड रुपाने उल्लेख केलेला असल्यामुळे  वकीलीची डिग्री, बारकाॅन्शिल कडील रजिस्ट्रेशन , आणि नावाच्या मागे अॅड. लावून लोकांवर दबाव टाकणे आणि लाचखोरीचे प्रकरण याचा सम्बध यथावकाश तपासला जात असल्याचीi माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.तुर्त ऊसतोड कामगार विकास मंडळाचा अध्यक्ष तथा मुख्याध्यापक उद्धव कराड यास मुख्याध्यापक पदावरुन निलंबित करण्यात आले आहे.